Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Deokule

Others

3  

Sunil Deokule

Others

जगी आहे कोण साव?

जगी आहे कोण साव?

1 min
7.2K


जगी आहे कोण साव?

घ्यावे वाटले जाणुन

पाहे जेव्हा सर्व जागी

भेटलाच नाही कोण .... | धृ |

मंदिरात दिसे भक्ती

दान देई यथा शक्ती

कमाईचे हे साधन

दान दे रे तू सत्कर्मी

भक्तिचाच तुझ्या येथे

मांडला बघ बाजार ....पाहे जेव्हा |१ |

जत्रेमधे जाता पाही

खेळणी, विविध रंग

त्याला पाहुनीया होई

लहान थोरही दंग

पैशासाठी सारी माया

माणसांची नसे जाण ... पाहे जेव्हा |२ |

मल्टीप्लेक्स जागोजागी

त्याची सांगू काय कथा

त्यात महागाई भारी

कुणा सांगावी ही व्यथा

सरकारची त्याला साथ

जनां नाही माई बाप .... पाहे जेव्हा | ३ |

गरीबाच्या घरी गेलो

दिली भाकरी पोटाला

दोन शब्द प्रेमाचे हे

मज भेटले ऐकाया

जाण त्यालाच प्रेमाची

ज्याच्या ठायी माणुसकी .... पाहे जेव्हा | ४ |


Rate this content
Log in