STORYMIRROR

Ramesh Sawant

Inspirational Others

3  

Ramesh Sawant

Inspirational Others

सत्याच्या शोधात

सत्याच्या शोधात

1 min
14.5K


आताशा मी जागेपणीही झोपतो

टक्क डोळे उघडे ठेवून

आणि डोके बधिर करून

मी असं का करतो 

असं विचाराल तर

तुम्हाला म्हणून सांगतो

माझ्या डोळ्यातली नजरच मेलीय

आणि डोकंही नाही ठिकाणावर

हवं तर तुम्हीच बघा आजूबाजूला 

काही दिसलं भन्नाट

तर डोळे फाडून पाहाच

अन कुणी बोललं वावगं,

तर जरूर कान देऊन ऐका

मग मात्र तुमचं डोकं 

थोडं जरी ठिकाणावर राहिलं असेल 

तर तुमचा आतला आवाज 

ओठांवर येऊ पाहील

पण शब्दच फुटणार नाहीत

कारण,की तुमचं मीपण

तुम्ही हरवून बसला असाल

इतकंच नव्हे तर

डोळ्यांवर झापडं असल्याने

तुम्हाला नाकासमोर चालण्यावाचून

काहीच मार्ग नाही उरणार 

म्हणूनच मग जिथवर तुमचे डोळे पाहतील

तेच खरं वाटेल तुम्हाला

तुमच्या आतल्या आवाजाला ओ देत

तसेच चाचपडत जाल तुम्ही

सत्याच्या शोधात

माझ्यासारखेच,जागेपणी झोपत

डोळे टक्क उघडे ठेवून

    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational