STORYMIRROR

Anjum Shaikh

Inspirational

3  

Anjum Shaikh

Inspirational

महती तिरंग्याची

महती तिरंग्याची

1 min
207

आमुच्या या तिरंग्याची

किर्ती इतकी व्हावी

स्वातंत्र्यदिन आमुचा नि

सलामी जगतात द्यावी...१


प्रत्येक क्षणी त्याचा

मान आम्हीच राखू

जगतात चोहीकडे

सदैव तिरंगाच उंचावू...२


फक्त सिंधू, कल्पनानेच

का आपली कला दाखवावी? 

तर प्रत्येक भारतीयानेच

तिरंगाची शान वाढवावी...३


विजयासाठी अपूल्या

अनेकांनी आहुती दिली

तिरंगाची ही कथा सर्वांनी

अभिमानाने आहे ऐकली...४


आता गुलाम बनविण्याची

हिंमत ना कुणी करावी

अशी ताकत आम्हाला

तिरंगा पासूनच मिळावी...५


तीन रंग तिरंग्याचे दर्शवी 

एकात्मता भारत देशाची 

अजून काय बरं वर्णवू 

महती आमुच्या तिरंग्याची?...६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational