दिव्यांची दिवाळी
दिव्यांची दिवाळी
दिव्यांची दिवाळी
आली बघा घरोघरी
बरसतील अंगणी
आनंदाच्या सरी
होतील प्रकाशित
भाग्य सर्वांचे सारे
उत्साही वातावरणी
दुःखही आता हारे
फटाक्यांच्या आवाजाने
दैत्य पळतील दूर
गोड गोड खाऊ आता
मिळेल सर्वां भरपूर
दोन वर्ष कोरोना मुळे
होती दिवाळी हरवली
लसीकरणाने पुन्हा
सुखाची पावलं उचलली
खूप घराघरातुनी
गेले दूर जवळचे
दिवाळीत त्यांसही देवा
दे काही क्षण हर्षाचे
रंक असो अथवा राव
करावे स्वागत दिवाळीचे
सुरक्षित साजरा करा सण
वर्षाव करते शुभेच्छांचे
