आधार
आधार
र्षक -
टिमटिमणारा प्रकाश
काळोखी नभी पाहिला
म्हणे दिसेल त्यात 'आई'
मला ताराच फक्त दिसला...(१)
नव्हतेच कळत मजला
अधिक तेव्हा काही
जीवनाचा तुच आधार
जगलो तुझ्यासवे आई..(२)
शिकलो बोलायला थोडे
तेव्हा 'आई' हाक मारी
माझ्या बोबड्या हाकेला
तू साद मात्र न देई...(३)
कळलंच नाही मजला
का झालीस तू अदृश्य
पापण्या झाल्या ओल्या
नि काळजात झालं हुश्श्य...(४)
हवा होता गं मला
तुझ्याच प्रेमाचा आधार
का गेली न सांगताच
करून लेकराला निराधार...(५)
येता तुझी आठवण
आजही ठोके होतात बंद
ग्रीष्मातल्या ऋतूत ही
होतात हात पाय हे थंड...(६)
तू नसताना निकट
मिळाले दिखावे प्रेम खुप
पण भेटली नाही मला
तुझ्या मायेची गोड ऊब...(७)
सोडून मागे सर्व काही
बालपणातून तरुणाई आली
तुझ्याच आठवांच्या सहारे
यशाची शिडी मी गाठली...(८)
म्हणतात जन हे सारे
आहे माझ्याजवळ सर्वकाही
कसं सांगू त्यांना आता
तुझ्या विना आहे मी भिकारी...(९)
भेटशिलच तु कधी तरी
आहे अजूनही आस नयनी
मला मिठीत तुझ्या घेऊन
दे पुन्हा आधार या जीवनी...(१०)
