माणुसकीचा रंग
माणुसकीचा रंग
माणसा रे माणसा
सांग, रंग तुझा कसा;
जिथे जातोस तिथे
कसे बदले रंग असा.
कामं करी तू आपूली
वानी ठेवूनी खूप गोड;
तुझ्या या छान रंगाला
नाही बघ कशाची तोड.
फायद्यासाठी कधीही
धरी तू सर्वांचे पाय;
सरता गरज स्वत:ची
नाही पुन्हा तिथं जाय.
आहे स्वतःच लाडकं
दुसऱ्यांचे मात्र कार्ट;
शोधी सुख त्या दुःखांत
आहे किती रे तू धूर्त!!
ठेव दचका विधात्याचा
नको बदलु रंग इतका;
जाईल खाली हातानं
नाही कामी येई टका.
मायेचे दोन शब्द तुझे
ठरती तुलाच फायद्याचे;
झाली माती तुझी जरी
स्मरतील शब्द मोलाचे.
रंग तुझा माणुसकीचा
नको करू असा फिकटं;
सत्कर्म कर तू माणसा
होईल रंग तुझा गडद!!
