क्रांती
क्रांती
नव्या युगाची, नव्या पिढीची
आहोत अशी आम्ही लेकरं,
चला करूया क्रांती नवी
नाही आता कशाची फिकीर..
आहेत अल्लड नि बावरी
आवड आम्हां नव निर्मितीची,
करीतो बुद्धीनं, कलागुणांनं
घोषणा अमुच्या अविष्काराची..
महामानवाची विचारधारा
आणुनी आम्ही आचरणात,
पेटवूनी नव क्रांतीची मशाल
आनंद देऊ सर्वां जीवनात..
ठेऊ जीवनशैलीत आमुच्या
फक्त विचारांची आधुनिकता,
वैचारिक क्रांतीने, बघा हो!!
वाढेल देशाची प्रगतीकता..
जगा नि जगू द्या मानवा
माणूस म्हणूनी या जगतात,
सर्वपल्लींची ही शिकवण
सदैव ठेऊ आम्ही आठवांत..
