शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
1 min
134
ओसाड माळरानी
शब्द बीजं पेरले,
कळलेच नाही गं
शब्दांकूर फुलले..
हळूच अंकुराने
केली घट्ट पकड,
शब्दाला उखडणे
झाले खूपच जड..
शब्दांकूराला आता
फुटे शब्द पालवी,
नाजूक अशी छान
भासे कधी हळवी..
शब्दपालवी माझी
बहरू गेली अशी,
वसंत ऋतूत गं
रानं सजती जशी..
छोटं रोपं शब्दाचं
नकळत वाढले,
सामान्य गृहिणी गं
कवयित्री जाहले..
शब्द रोप माझेही
वाढावे सहाजिक,
गणली जाईल मी
छोटीशी साहित्यिक..
