महागाई
महागाई
विचार करीत होतो थकले जरी
पुन्हा एकदा सावरण्याची,
तुटून पडला संसार सारा
हिंमत होती त्यास उभारण्याची..१
हळू हळू चोरपावलांनी बघा
सर्वांच्याच आयुष्यात आली,
चांगल्या दिसांची हमी देऊनही
आत्मविश्वासं साऱ्यांची तोडली..२
एका सवती पेक्षा जास्त
केले आहेत हाल-हाल तिनं,
नाही जात किती हाकलले तरी
नाकीनऊ करून ठेवलं जिणं..३
नाही दुसरी तिसरी कोणी
आहे सोयरीच ती 'महागाई',
दूर राहते असे वाटले जरी
येते पटकन करून घाईघाई..४
चकापका करून राहणाऱ्यांना
फरक पडतो का विचारा आधी,
समुद्राचं पाणी कितीही उपसलं
तरी सहज आटतं का कधी?..५
हातावर कमून खाणाऱ्यांची
आहे महागाई पक्की वैरीण,
कितीही भिकेची लाच दिली
तरी बनवू नका हो तिसं मैत्रीण..६
गोड गोड बोलून ती शहाणी
कायमची वास्तव करेल बाई,
जागे व्हा लवकर बाबांनो नाहीतर
कायमची निद्रस्थ करेल महागाई..७
