Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Anjum Shaikh

Abstract

3  

Anjum Shaikh

Abstract

कसे जगावे

कसे जगावे

1 min
149


सांगा ना जरा, कसे जगावे,

मोती चक्षूंचे, कसे पुसावे...||धृ||


कोण परकं, कोण आपलं,

नाही कळत, आता सगळं,

सर्वच असं, दूर चाललं,

मनी कोणास, ठेवू जवळ,

माझे मलाच, कसे कळावे...||१||


पैशांचा आहे, खेळ हा सारा,

आपुलकीचा, उगी पसारा,

अबोल भाव, शब्दांचा मारा,

पदरा आड, अश्रूंच्या धारा,

अंतर्मनाला, का तडपावे...||२||


दारी तुळस, छान पुजती,

दुजा बागेची, कळी तोडती,

जीवन व्यथा, न समजती,

उपदेशाचा, डंका फोडती,

त्यांसाठी का हो, मी बदलावे?...||३||


ताई नि बाई, न कळे कोणा,

स्वतृप्तीसाठी, पिळती त्यांना,

तरी उंचावी, आपुल्या माना,

दुजेच मुके, उगाच प्राणा,

रहस्य याचे, कसे जाणावे??...||४||


Rate this content
Log in