STORYMIRROR

Anjum Shaikh

Abstract

3  

Anjum Shaikh

Abstract

संगत

संगत

1 min
180

आहे संगत खूपच

जगण्यास अनमोल, 

कुसंगत लाभे तर 

सारे होई मातीमोल..


माय बाबांची संगत

देई कलाटी जीवना,

कृत्य कसेही करूनी 

सुख देती लेकरांना..


गुरु सांगाती ज्ञानाचा

देई आकार घड्याला,

सुसंगती मिळे जर

मार्ग यशाचा गड्याला..


पदोपदी भासे सर्वां

खरी संगत मैत्रीची,

सांगू विश्वासाने त्यांस

सारी गुपितं मनाची..


जन्मोजन्मी संगतीत

प्रेम साथीही असावा, 

सुख दुःखात आपणा

खांदा त्याचाच मिळावा..


पानं पिकती तेव्हाची

हवी सांगाती लेकरं,

सुसंस्कार  आठवूनी

नाही  करती  बेघरं..


अशी असावी संगत

एक दुजाची साऱ्यांना,

सांभाळावी  हृदयाने

खेद न व्हावा मनांना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract