पैशाने मोठा होतो कोण
पैशाने मोठा होतो कोण
पैशाने मोठा होतो ना माणूस ना पशू-पक्षी,
हातात येते सत्ता पण ना मिळते वामकुक्षी
पैशांविना हालते ना पान मिळतो ना मान,
पण माणूसकी ही तर आपुलकीची खान
पैसा म्हणजे ऐश-ऐश्वर्य अन असतो प्रशस्त,
सारे काही सोडून येथे व्हावे लागते मार्गस्थ
असे जवळी ज्याच्या मुबलक पैसा अडका,
नसे कधीही तो या जनतेचा लाडका
श्रीमंतीचे हे डोंगर असती दुरून साजिरे,
या झोपडीतील सुख माझ्या नेहमीच गोजिरे
पैशाने मोठा होतो ना माणूस ना पशू-पक्षी,
हातात येते सत्ता पण ना मिळते वामकुक्षी
