जीवनसाथी
जीवनसाथी
गुणगान किती गाऊ ग तुझं,
अर्ध आयुष्य संपलं ग माझं.
जन्म दिला ग तो आई बापानं,
पांग फेडलं ग ते या मुलानं.
पर्वा न करता ग तू कशाची,
साथ दिलीस ग या जन्माची.
करुनी ग दिवस हा रात्रीचा,
रचलास ग डोंगर भविष्यातील स्वप्नांचा.
कधी काढुनी ग चिमटा पोटाला,
लेकरांसी वाढविले ग धरुनी बोटाला.
राखुनी मर्जी ग ती थोरा मोठ्यांची,
कधी सांभाळलीस ग लहानांची.
सरुनी तरुणपण ग म्हातारपण हे ठाकलं,
वंदन करण्यास तुला ग गुडघं हे टेकलं.
मिळू दे ग साथ तुझी ही जन्मोजन्मीची,
ठेवील ग जाणीव ती तुझ्या उपकारांची.
