आजारांचा बाजार
आजारांचा बाजार
बाजार भरलाय साऱ्याच रोगांचा,
भरवसा काय राहिलाय या देहाचा.
थंडी ताप उलट्या जुलाब,
सर्दी खोकला तब्येत खराब.
लिव्हर किडनी पोटाचे विकार,
वाढू लागलेत नवनवे आजार.
कधी पॅरॅलियासिस तर कधी अटॅक,
शरिरात करतोय खळ खट्याक.
फुफ्फुसावर निमोनियाचे इम्प्रेशन,
मनातलं मन स्विकारतंय डिप्रेशन.
थायराॅईडची वाटतेय घशाला भीती,
कमी होत चाललीय हृदयाची गती.
किती करणार विचार आतल्या आत,
झपाट्याने पसरतोय संधीवात.
जरी कितीही बसवले सेन्सर,
तरी महागात पडतोय कॅन्सर.
कधी होतील निकामी हात पाय,
हे कोणालाच सांगता येणार नाय.
कान नाक घसा चाललाय खराब होऊन,
सारं ठीक ठाक असेपर्यंतच घ्यावं हसून.
