माझी......
माझी......
नादान मी परिंदा
गगन मला मावेना
हाय हे रंगीन पाखरं
घरट्यात माझ्या एकही येईना
मोकाट मन हे
नजरेच्या पुढं पुढं
मागं मागं तिच्या
अन् कुणावरच थांबेना
कल्पनांना माझ्या
हुबेहूब रूप नटीचं
माजलं सौंदर्याचं वादळ
तो ययाति माझ्यातला थकेना
रोम रोम ताठलेल
अंगाचा उत्साह आवरेना
होऊ दे मनाचं पतन शीघ्र
मग स्वप्नांत दोष का होईना
मनचला मै मजनू
ये हसीना मानेना
जल जायेगी तेरी जवानी
तू दिवानगी मेरी जानेना
अखेर, गात... सावरत...
तोल तारुण्याचा
मी पोहोचलो माझ्या दारात
तीच...
कडाडती वीज
कोसळली आत्म्यावर
छिन्न विच्छिन्न भग्न... नग्न
ती 'माझी......'
निर्भया
घरात होती बिखरलेली
