शिल्पकार सुखी जीवनाचा
शिल्पकार सुखी जीवनाचा
आता नाही कोणी तुझ्या सोबतीला
जपताना इतरांस हरलवलेस स्वतःला
जपले प्रेमाने, आपले म्हणून ज्याला
दृष्टीकोन त्याचा, सरड्यासम बदलला
उरले न कोणी तुला समजून घ्यायला
ठेवला नाही खांदा डोक ठेवायला
जागा नाही बनवली मोकळे व्हायला
का विचार करायचा त्या जगाचा
पाठलाग कर तुझ्या स्वप्नांचा
विसर नको पडू देवू आत्मशक्तीचा
होऊ दे स्वतःवर, वर्षाव प्रेमाचा
लक्षात असू दे सल्ला तू विशालचा
तूच आहे शिल्पकार सुखी जीवनाचा
विशाल पुणतांबेकर
