STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

चांद्रयान मोहीम

चांद्रयान मोहीम

1 min
196

वाढविली भारत देशाची शान

उंचविली प्रत्येक भारतीयाची मान

यशस्वी झाले चंद्रावर म्यान

इस्रोचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान


चांद्रयान १ ने रचिला प्रथम पाया

चांद्रयान २ चे बलिदान न गेले वाया

ऑर्बिटरने मदत केली संपर्क कराया

चुकांमधून शिकवले यशस्वी ह्यावया


चंद्रावर उतरlल्या तीन महासत्ता

न गवसला त्यांसी दक्षिण धृवाचा पत्ता

जाहले प्रणेते खर्चुन अल्प प्रवासी भत्ता

जगाने गिरवावा काटकसरीचा कित्ता

अवकाशात उदयास आली नवमहासत्ता


निंबोनी झाडामागे चांदोमामा लपला होता

प्रज्ञान रोव्हर त्याला जगासमोर आणणार

दक्षिण ध्रुव जगाला अनोळखी होता

भारत त्याची जगला ओळख करुन देणार


केला निर्माण तंत्रज्ञानाचा दबदबा इस्रोने

आता भारतीय बुद्धिमतेचा जग आळवतो सुर

जेव्हा चंद्राला स्पर्श केला भारताने

प्रत्येक देशवासियाचा आला भरुन ऊर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational