STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

आदर्श चांगुलपणाचा

आदर्श चांगुलपणाचा

1 min
2

साधकबाधक चर्चा हा तर जिवंतपणा

अमृत म्हणून बाहेर पडतो चांगुलपणा

विष म्हणून बाहेर पडतो तो वाईटपणा

हाच तर आहे विचारमंथनाचा कणा


प्रत्येक व्यवसायात असतात वाईट प्रवृत्ती

व्यवसायाला बट्टा लावते त्याची कृती

अश्या लोकांमुळे नको व्यवसायावर प्रहार

ती ठरेल अजुनही जिवंत त्या माणुसकीची हार


कोणताही व्यवसाय वाईट नसतो 

भाग असतो ज्याच्या त्याच्या संस्काराचा

आपण सर्व मनापासून काम करतो

हा ठेवा आहे आपल्या आई वडिलांचा


वैद्यकीय श्रेत्र वाचविते प्राण लोकांचे 

त्याबद्दल मनापासून अभिनंदन त्यांचे

चला एकत्र येऊन करू सामना वाईटाचा

नवीन पिढीला देऊ आदर्श चांगुलपणाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational