STORYMIRROR

Ganesh Patade

Inspirational Others

4  

Ganesh Patade

Inspirational Others

पुस्तके

पुस्तके

1 min
22.8K

पुस्तके म्हणजे ज्ञानाचा सागर 

सामावतो त्यात विश्वाचा अखंड पसारा

किती वाचलं तरी कमीच पडतं

एकेक पानात दडतो अप्रतिम नजारा


कधी भावना कधी आवेग

सारेच कसे जिवंत वाटते

वाचता वाचता कधी 

डोळ्याच्या कडात पाणी दाटते


पुस्तके करतात मनांवर

विचारांचे सुंदर गारुड

शिकवून जातात नेहमी

उत्तमोत्तम विचारांचे भारुड


सोडावी वाटत नाही

कधीच त्यांची साथ

निराश मनाला देता ती

नवसंजीवनीचा हात


गळून जातात सुकल्यावर 

फुलांच्या सुंदर पाकळ्या

गाजवतात अधिराज्य पुस्तके

मनावर प्रतिबिंबित मोकळ्या


विचारांची खाण जणू

सापडतात माणिक मोती पाचू

जगण्याला देतात नवी दिशा

भरभरून घेऊ आस्वाद नि शब्दकण वेचू


मळली पानं तरी होत नाही कधीच जुनी

सदा टवटवित ताजी

विचाररुपी सुगंधीत अत्तर

शिंपडण्या ती नेहमीच राजी


सोडतील एखाद वेळेस

मित्र सगे सोयरेही तुमची सोबत

बळ देतील वादळात हिंमतीने जगण्याचं

ही पुस्तकरूपी गलबत


डिजिटल झाले युग जरी

पुस्तक वाचण्याची मज्जाच भारी

परत परत करावी वाटते या

अजब दुनियेची सफर न्यारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational