गुरूंचा महिमा
गुरूंचा महिमा
1 min
112
अगाध महिमा गुरूंचा
किती गुण तयांचे गावे
या प्रेमळ चरणांशी
सदा नतमस्तक व्हावे
गुरुविण आम्हा
कोण दाखवील वाट
गुरु म्हणजेच आहे
तिमिरातील पहाट
गुरुविण नाही
ज्ञानाचा प्रकाश
गुरु कृपेने उजळे
भाग्याचे आकाश
गुरु चैतन्याचा झरा
वाहतो सदाकाळ
उघडतो आशेचे कवाड
लेखतो उज्ज्वल भविष्याचे भाळ
भजावा नित्य गुरु
गुरुविण नाही तरणोपाय
आई नंतर आहे
गुरु दुसरी ती माय