सागर
सागर
अमर्याद तुझी खोली
निळेपण तुझे भुलवी
होता तुझ्यातच गुंग
वाटे ईश हा झुलवी
नाही आदी आणि अंत
समर्पण तुझे जसा प्रेमभाव
घेतोस सामावून सर्वां
विसरुनी सारा भेदभाव
किती माणिक मोती रत्ने
लपली तुझ्याच अंतरी
अशी लाभली गुणांची खाण
माझ्या मायभूमी दिगंतरी
तुझ्या लाटांचे सुमधूर
नित्य संगीत गाजते
पाहुनी रौद्र रूप तुझे
भये काळीज वाजते
पाहुनी तुला वाहे
हर्ष लाट मना नित्य
निळ्याशार जलासवे
उजळावे सदा सत्य
असे तुलाही सागरा
भरती ओहोटीची काळ
म्हणूनी जपावी माणसा
नात्यांमधली नाळ