शीर्षक -शेतकरी बाप माझा
शीर्षक -शेतकरी बाप माझा
1 min
25
साऱ्या जगाचा पोशिंदा
शेतकरी माझा बाप
कष्टास ना सीमा
पदरी गरिबीचे माप ll१ll
शिवार हीच पंढरी
भजे ना अन्य देवा
व्याकूळ जरी नयन
घेई कधी ना विसावा ll२ll
गेली जिंदगी मातीत
खरा धरणीचा पुत्र
त्याच्या घामात लपते
सारे जगण्याचे सूत्र ll३ll
पोटच्या पोरावानी घेतो
काळजी सगळ्या पिकाची
रान बहरून अवघे येता
गळते आसवे सुखाची ll४ll
मातीत त्याचा जन्म
जपली प्रेमाने नाळ
याच धरणीने रेखिले
त्याच्या आयुष्याचे भाळ ll५ll
