आला श्रावण
आला श्रावण
आला श्रावण महिना
चिंब भिजविती सरी
पांघरून हिरवी शाल
सृष्टी भासे नववधूपरी
आला श्रावण महिना
व्रतवैकल्यांचा सण
नागराया ओवाळिते
प्रेमे ही माहेरवाशीण
सण रक्षाबंधनाचा
प्रेम बहीण-भावाचे वाढे
असा श्रावण येतो
आठवणी घेऊन लाडे
भक्तीरंगात रंगवितो
कृष्णाचा गोपाळकाला
गणरायाच्या आगमना
ऋतू हर्षित हा झाला
पसरे नात्यांचा गंध
श्रावणातल्या सरीसवे
वाढूनी हृदयी प्रेमभाव
बंध जुळतील नवे