STORYMIRROR

Ganesh Patade

Classics

4  

Ganesh Patade

Classics

माझा गणराया

माझा गणराया

1 min
108

कृपेचा सागरl माझा गणरायाl

संकट हरायाl धाव घेईll१ll


जगताचा त्राताl भक्तांचा आधारl

मिटे दुःखभारl विघ्न हर्ताll२ll


गणांचा प्रमुखl प्रभू गौरीपुत्रl

जगण्याचे सूत्रl तव हातीll३ll


आवडे मोदकl जास्वंद नी दुर्वाl

उर भरे गर्वा l दर्शनानेll४ll


शोभे गजमुखl मूषक वाहनl

कृपाळू नयन l गजाननाll५ll


मस्तकी मुकुटl हाती तव पाशl 

दुष्टांचा विनाशl एकदंताll६ll


विद्येचा तू दाताl तू मंगलमूर्तीl

देई मज स्फूर्तीl लंबोदराll७ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics