विश्वास...!
विश्वास...!
दिसत तस नसत
म्हणून जग फसत
हे जर खर असत
तर जग चाललं नसत
दृष्टी तशी सृष्टी
हीच यशाची पूष्टी
कराव्या प्रेमाच्या गोष्टी
बाजूला जाऊदे उठाठेव नसती
झाकली मूठ सव्वा लाखाची
खरेच असते बहूमोलाची
ताकत वसते तयात धन्याची
हीच पक्की गाठ सौ मनाची
साताजन्मचे नाते विश्वासात वसते
गाठी भेट झूट तरी स्वप्न सत्य होते
मान अपमान प्रेमभंग बासनात जाते
गृहालक्ष्मीचे हृदयात जेंव्हा स्वागत होते
साताजन्माची बांधली जाते घट्ट गाठ
लक्ष्मीच्या दोरीला गाठी सत्तराशे साठ
झाली जरी संसारी थोडी कटकट
काळ सरतो सुखाने ऐकता वटवट पटापट
म्हणून झाकली असो की उघडी असो
धन्याचीच वज्र मूठ लै भारी
जी सर्वांवर विश्वासाने मात करी
गृहलक्ष्मी सुखी समाधानी राहण्या घरी...!!
