नातं नवरसांनी सजावं
नातं नवरसांनी सजावं
मलाही वाटतं तुला बोलाव, तू अलगद लाजावं
प्रत्येक त्या नवरसांनी, नातं असं काही सजावं
सारं काही तूझ्या जवळ, कायम ते असावं
आपुलकीनं थोडं रागावून, हलकंच मग रुसावं
कधी चुकलो आपण जरी, तरी तुटणारं नातं नसावं
प्रत्येक त्या नवरसांनी, नातं असं काही सजावं
भेट झाली या क्षणी, तरी काही अंतर नसावं
येऊनी अलगद कशी, माझ्या जावळी बसावं
लाजून असे ते, गोड गाली हसावं
प्रत्येक त्या नवरसांनी, नातं असं काही सजावं
कधी कधी रागाने, आयुष्यही माजावं
हलक्या हलक्या शब्दांनी, तू माझ्याशी भांडावं
नंतर मी हळुवार हसत, सारं तुला समजावं
प्रत्येक त्या नवरसांनी, नातं असं काही सजावं
तत्परता ठेऊन संसार, येणाऱ्या संकटा घाबरावं
अनोळखी सुखाला, नव्या शहरात डरावं
पण सामना साऱ्या, सुखं दुःखाचा हसमुख करावं
प्रत्येक त्या नवरसांनी, नातं असं काही सजावं