दंभ...!
दंभ...!
माणूस स्वभाव मोठा विचित्र
घडवितो क्षणोक्षणी चरित्र
मग तो कोणाचा का असेना पुत्र
अनुभवाचेच कामी येते सूत्र....!
कोपरखळी मारता मारता
अवस्था अनुभवाची कथिली
हाती काहीच लागले नाही
बसलेत घेऊन रिकामी पातेली....!
तडफड होते का ते आता
खुर्चीत बसूनही सांगता येईना
हरघडीस पहावा लागतो
आपल्याच अंतराचा आईना..(आरसा)..!
स्वानुभवाचे बोल ओठावर येतात
आपलीच अवस्था कथन करतात
नित्य नको त्याचे पाय धरतात
टांगत्या तलवारी खाली खुर्ची सांभाळतात...!
सत्य असे हे उघडे पडते
सर्वसामान्यांना अवचित दर्शन घडते
मनी असूनही पाऊल अडते
मिणद्यांचे जीवन वाटते असेच असते...!
बोलाची कढी बोलाचा भात
वेळ काढू पणाचा सारा घाट
लागली पुरती जरी वाट
दाखवावा लागतो सरंजामी थाट....!
