किस काढणे..!
किस काढणे..!
किस काढणे
किती मजेशीर शब्द
करतो कधी कधी निशब्द....
अर्थ बोध होणे
भाषेचे खरे
सौन्दर्य...
दाखवुया की
आता तरी भाषेसाठी
औदार्य....
आपलं पोर ते बाळू
आता थोडे ते टाळू
भाषेला प्रेमे कुरवाळू...
विशेषणांची ,उपमेची
आणि इतर व्याकरणाची गोडी
थोडे थोडे बंध सोडी...
कधी कधी
काढली तर थोडी खोडी
वाढेल ना भाषेची गोडी...
किस काढणे
इतके काही
बरे नव्हे....
कांदे पोह्यात
कांद्याबरोबर
थोडे चवीसाठी आले हवे....
अंतराचा
आवाज उमटणे
हेच भाषेचे सौन्दर्य खरे
सरते शेवटी
जे न पाही रवी
ते पाही कवी
हेच सत्य अंती उरे...!
