STORYMIRROR

Prashant Shinde

Classics Others

3  

Prashant Shinde

Classics Others

आलेपाक दडपे पोहे...!

आलेपाक दडपे पोहे...!

1 min
178

आलेपाक दडपे पोहे....!

दडपे पोहे दडपे पोहे

हा प्रकारचं वेगळा आहे

मोजक्याच तोंडाचा तो

आवडता पदार्थ आहे...

केंव्हाही कधीही कितीही

ही याची

ठराविक घरी ख्याती आहे

कोणालाही आवडेल अशी याची

साधी सोपी गावठी रीत आहे...

पोहे कांदा कोथिंबीर ओले खोबरे

शंगदाणा शेव टोम्याटो थोडे आले बरे

फोडणीचा थाट कडीपत्ता घालून

मिरचीच्या तडक्यासह कोबी

वाढवीतो लज्जत चवीची हे खरे ...

सजली थाळी पाहून मन

खरोखरच अचंबित होते

दडप्या पोह्याचा स्वाद घेताना

अंतरमनही तृप्ततेने प्रसन्न होते...

अशी अवीट गोडीची पाककृती

घरोघरी इथेच फक्त होते

म्हणून ती सर्वांमुखी पडते

जेंव्हा सरंजामी खाद्याचे दर्शन घडते...

तेंव्हा कोठे परमानंदाचे सौख्य मिळते ....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics