तुझ्या वाढदिवशी
तुझ्या वाढदिवशी
तुला पाहिले मी जरा भांडतांना
हिमालीची गे हळू छेड काढतांना
तुझे रुप देखणे हे नवे पाहिले मी.
कळी फुलाचे नव रूप लेवतांना
जरी देखणे लावण्य तुझे परी गे
नसे दर्प तुझिया हळव्या मनाला
तशी चपला ,चंचला चालतांना
परी सोज्वळा,सादगी वागतांना
तुझे हास्य ऐसे,कि सडे चांदण्यांचे
मनाचे मनाशी दुवे जोडण्याचे
सहवास तुझा गे असा चंदनाचा
रानचाफ्यापरी गंथ पेरण्याचा
अशी पाऊले भविष्यात टाक बाळे
यश नि समृध्दी तुझ्या पायी लोळे
तुला हया दिनी अजुनी काय देऊ
बदलत्या जगाचे चला वेध घेऊ
