STORYMIRROR

Yeshoda Patil

Abstract Others

4  

Yeshoda Patil

Abstract Others

जगात स्वप्नांच्या

जगात स्वप्नांच्या

1 min
526

असा येई स्वपनात

जरा चोर पाऊलांनी

माझं बाळ झोपलेलं

बघ जाईल उठूनी


माझ्या दुःखाची ओंजळ

तुझ्पा ओंजळीत रिती

माझ्या मनीचा सुगंध

तुझे ओठ त्याला गाती


तुला सांगायची होती

एक झिम्माड गंमत

चांदण्यांनी नटलेले

शांत निवांत आकाश


पानफुले नक्षत्रांची

टांगलेली आभाळाला

जसा गहिऱ्या डोहात

थवा हंसांचा पांगला


शांत निरव आकाश

त्याला ढगांची दुलई

मीही निवांत झोपले

जगी स्वप्नांच्या जादुई


उलगडेन मी म्हणते

माझ्या मनीचा आरसा

काय सांगावे जिवाचे

नाही क्षणाचा भरोसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract