STORYMIRROR

Yeshoda Patil

Romance

3  

Yeshoda Patil

Romance

साथ जन्मोजन्मीची

साथ जन्मोजन्मीची

1 min
534

साथ जन्मोजन्मीची

तुझ्या माझ्या प्रीतीची 

खळखळ झऱ्याची

मावळत्या सूर्याची


दिल्या आणाभाकांची

रुसलेल्पा क्षणांची

पुसलेल्या अश्रूंची

सोसल्या वेदनांची


पौर्णिमेच्या चंद्राची

सोबती चांदण्यांची

वाहणाऱ्या वाऱ्याची

पडणाऱ्या पावसाची


कडाडत्या विजांची

मारलेल्या मिठीची

ओल्याचिंब देहाची

केवड्याच्या गंधाची


पांघरलेल्या ढगांची

ओथंबलेल्या मेधांची

आठवांच्या दाटींची

साथ जन्मोजन्मीची


ओढ़ माळरानाची

पिंपळाच्या पाराची

वेचलेल्पा क्षणांची

गायीलेल्या गाण्यांची


पाहिलेल्पा स्वप्नांची

घेतलेल्या कष्टांची

स्वप्नपूर्ती झाल्याची

साथ जन्मोजन्मीची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance