STORYMIRROR

Yeshoda Patil

Others

3  

Yeshoda Patil

Others

तृषार्त

तृषार्त

1 min
592

गोड तुझ्या आठवात

बरसला रे श्रावण

डोळयातून आज वाहे

माझे घायाळ हे मन


ऊण्या पुऱ्या भेटी झाल्या

अशा झाल्या ताटा तुटी

अंतरीच्या हया जखमा

मुक्त होऊनी वाहती


मंद धुंद सहवास

माझ्या मनात मुरला

कण कण हा देहाचा

गंध चंदनाचा ल्पाला


काय झाले ते कळेना

आठवण ओसंडते

जसे तापवले दुध

भाडयांतून ऊतू जाते


घन भरले आकाश

भेगाळ्ल्या त्या जमिनी

माझे मनही झुरते

झाली हृद्याची चाळणी


मन माझे आक्रंदते

असा ये ना सरीसंगे

अंग अंग कर चिंब

वेडे मन सारे मागे



Rate this content
Log in