ओटी खणा-नारळाची
ओटी खणा-नारळाची
1 min
450
आदिमाया प्रकटली
तीच्या कृपेचा कहर
भक्तीभावे मी करीते
नवरात्रीचा जागर
पुजेसाठी आईच्या मी
पहा गोंधळ मांडला
नऊ दिस उपवास
मोह अन्नाचा सोडला
कधी चंडीका स्वरूप
कधी प्रतिमा दुर्गेची
अष्टभुजा माय माझी
ओटी खणा-नारळाची
करी भक्तांवरी कृपा
आदिमाय जगदंबा
नैवदयाला मी वाहते
लालनारींगीं डाळींबा
नऊ दिस नऊ रंगी
साडी चोळीचं लेवणं
वडा हलवा पुरीचं
माझ्या मायेचं जेवणं
माझ्या गोंधळाला यावे
माझ्या मायेला भेटावे
जन्ममरणाचे फेरे
आदिमायेनी तोड़ावे
