STORYMIRROR

Yeshoda Patil

Others

3  

Yeshoda Patil

Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
495

बघ सांजवेळ झाली 

रवि अस्त आज झाला

 येती पाखरे दमलेली

घरट्यात आश्रयाला


उजळोनी दिपज्योती

जोडोनिया हात दोन्ही

घरी शुभं करोतीचे

पडतात सूर कानी


तुळशीपुढे दिव्याची

हळू ज्योत तेवतांना

तीत देव पाहीला मी

मळ वाट दावतांना


गाई सुसाट सुटल्या

पळता भुईही थोडी

गोठयातली वासरेही

हंबरूनी झाली वेडी


अंगणात ही जुईही

थोड़ी मलुल झाली

ती बोलली कळ्यांना

निजण्याची वेळ झाली


वाहणारा मंद वारा

सुस्तावूनी बोलला तो

चला थांबूया गडयांनो

बघा झोपला रवि तो


Rate this content
Log in