STORYMIRROR

Yeshoda Patil

Others

3  

Yeshoda Patil

Others

साथ तुझी

साथ तुझी

1 min
268

साथ तुझीच पाहीजे होती

जिवनाच्या सारीपाटावर

दोघे जण बसलो असतो

पिंपळाच्या रात्री पारावर


हातात हात गळ्यात गळा

नजर मात्र क्षितीजावर

चित्र रेखीत ऊभे असतो

मऊशार ओल्या रेतीवर


ओले चिंब झालोच असतो

पावसाच्पा गोड तालावर

गार वारा झेलत असतो

ओलेत्याने ऊभ्या देहावर


पाऊस गारा उधाण वारा

निसर्गाच्या वेड्या तालावर

वेडे होऊन धुंद असतो

ओढयाच्या सुरेल चालीवर


रान केवडा माळला असता

केसांच्या बांधल्या जुळ्यावर

छान कविता केली असती

तुझ्या माझ्या गाढ प्रेमावर


पण प्राक्तन अबोध वेडया

नसते आपल्या मनावर

गीत आपले लिहीले गेले

विरहामध्ये त्या जळण्यावर


Rate this content
Log in