STORYMIRROR

Yeshoda Patil

Others

3  

Yeshoda Patil

Others

कोजागिरी ही पर्वणी

कोजागिरी ही पर्वणी

1 min
492

पूर्ण चंद्र पाहण्याची

कोजागिरी ही पर्वणी

चांदण्यात नाहण्याची

रात्र आज ही देखणी


बघ चुल पेटलेली

शुभ्र दुध आटण्याची

चंद्रासही झाली घाई

अमृतास धाडण्याची


मधु चांदणे नभीचे

तालावरी नाचतीते

जपतात शैशवाला

गाऊनीया गोड गीते


ह्वदयात अमृताचा

घेऊनीया कुंभ आला

माय लक्षुमीच्या हाती

आहे अमृताचा पेला


शारदिय पौर्णिमेचे

शुभ्र चांदणे निखळ

सौंदर्य ते टिपावया

पडे अपुरी ओंजळ


कुंभ घेऊन निघाली

कोण करी जागरण

कोण आहे तो जागता

त्याला द्यावयाचे धन


धन लुटण्या साठीच

कोजागीरी ही पर्वणी

रहा जागतरे कुंभ

 लक्ष्मी येईल घेऊनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन