STORYMIRROR

Yeshoda Patil

Romance

3  

Yeshoda Patil

Romance

छळतोय गारा वारा

छळतोय गारा वारा

1 min
656

सहवास तो सुखाचा

बघ पारखा बिचारा

जडलाय जीव ज्याला

छळतोय गार वारा


आसावल्या दो जिवांचा

मधुमास संथ झाला

छळतोय गार वारा

बघ तापल्या जिवाला


सहवास चांदण्यांचा

अन चंद्र सोबतीला

छळतोय गार वारा

तव हात हे उशाला


पौर्णिमेचा चंद्र अन

बघ लाजला निशेला

छळतोय गार वारा

मुखचंद्र म्लान झाला


मम लाडके अशी ये

विरहात सोबतीला

छळतोय गार वारा

उदयास शुक्र आला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance