STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

येरझार

येरझार

1 min
173

हिरवाईच्या पंखावरते

रंगीत नक्षी ही भिरभिरते

रंगरंगिल्या नभांगणी ते

नित गुंजन कोण हे करते ।।१।।

सृजनाच्या या बहरावरते

अंकुर नाजुक ते प्रसवते

अवनीच्या मखमली उदरावरते

नाजूक गोंदण ते हुंकारते ।।२।।

इवलेसे सोनसळी पाते

दावूनि वाकुल्या गभस्तीते

वारियावर हलकेच झुलते

आपल्या मस्तीतच ते डुलते ।।३।।

भाळुनि सोनसळीच्या तनुल रुपाते

कृष्ण मिलिंद ही वेडावतो

छंद साठवण्या मधु कणाते

एकतानतेनेही समरसते ।।४।।

उत्कट सुख क्षणी समिपते

गात्रोगात्री धुंदी चढते

मनोमनीचे बहरत नाते

बीज उन्मादाचे फुलते ।।५।।

जन्म फुकाचा वाया जातो

लक्षलक्ष योनीतून फीरतो

हरिनामाचे पुण्य जोडतो

तो या भवसागरी तरतो ।।६।।

जन्ममृत्यूची येरझार तो

कोण कसा तो कसा चुकवतो

हरिचरणांशी नाळ सांधतो

पैलतीरावर मोक्ष गवसतो ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics