STORYMIRROR

Anju Metkar

Others

3  

Anju Metkar

Others

तिन्हीसांज

तिन्हीसांज

1 min
103

तिन्हीसांजेच्या या समयी

सावल्यांची साथ नसे देही

प्राण कंठाशी अवगंठू पाही

शुष्क नेत्री विरक्तता मोही ।।

अनावर मन संसारापाशी धाव घेई

क्षणभंगुर सुखासाठी तडफड अंतरीची होई

सुख सुख म्हणता हे दुःखासी कारण होई

अनभिज्ञ तो यात गुरफटोनी जाई ।।

देहासी या असे आसक्ति

प्राणास नसे मोह चित्ती

वासांसी जीर्णानी हीच उक्ती

आत्मा पुन्हा पुन्हा वदे सक्ती ।।

नात्यांचा तो गोतावळा

मोहीत मनासी अडकवे हा सापळा

कोण कोणाचा नसे बाळा

भ्रमित मनीचा क्षणी फुटतो भोपळा ।।

देहाशी विटतो प्राण

तेथे कुठे असते नात्यांची जाण

दवबिंदूपरी अस्तित्वाचे असावे भान

हेच जाणूनी नासवावे क्रियमाण ।।

विजनात उमगते सारे

माझे माझे ते सारे अपुरे

हे आनंदस्त्रोत झरे

क्षणार्धात विझती हे फवारे ।।


Rate this content
Log in