श्रावणी पावसाचा खेळ
श्रावणी पावसाचा खेळ
मंत्रमुग्ध पावसाने
आज डाव मांडला
चहूकडे आनंदाने
आज खेळ खेळला....
सर धावते बघा
उन्ह पकडाया
पाठशिवणीचा खेळ
श्रावणी खेळाया....
झाड वेली नटल्या
पानी दवबिंदूचा खेळ
वर्षासंगे वाराही वाहे
त्याला उसंत ना वेळ...
इंद्रधनुचे रंग कसे
पावसाच्या संगी
ढगांच्या गळी जणू
माळ सप्तरंगी...
गुलाबी थंडी वाऱ्यात
धुके असे पसरले
जणू डोंगरदर्यांनी
पांढरट वस्त्रच लेयिले...
मृदगंध मंत्रमुग्ध
मंद शीतल वारा
जणू अत्तर सांडले
निर्मळ गंधाचा झरा....
