STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Classics

3  

Mahesh V Brahmankar

Classics

मृदंगंध पावसाचा!!

मृदंगंध पावसाचा!!

1 min
230

मला छंद पावसाचा!

मृदंगंध पावसाचा!!

पशुपक्षी किलबिलाटे!

मनी हर्ष तो लाभे!

त्या मृग नर्तकांचा!!


सुंदर त्या जलधारा!

गार गार वारा!!

तृप्त लाभ घ्यावा!

त्या मृदगंधाचा!!


हा खेळ पावसाचा!

निळ्याभोर अंबराचा!!

धरा परिधान करे!

शालू हरित तृणांचा!!


जीवसृष्टी तृप्त झाली!

त्या मृदंगंधाने!

शेतकरीराजा!

मनोमनी उल्हासे!!


मला छंद पावसाचा!

मृदंगंध पावसाचा!!

हा खेळ आहे!

सुंदर जलधारांचा!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics