ओढ वारीची..
ओढ वारीची..
ओढ वारीची
लागली पांडुरंगा,
भक्ती भावाचा
हा फुलवू धागा...
ओढ वारीची
लागली तुझी आस,
दरवळला सुगंध
तूच माझा श्वास...
ओढ वारीची
भेटताे नित्यनेमाने,
स्फुतीॅ येते मला
तुझ्या चिंतनाने...
ओढ वारीची
तगमगताे हा जीव,
तुझ्या भेटीने
तरेल माझी नाव...
