गोधन
गोधन
1 min
235
आम्हां सर्वांसाठी अमाेल गाेधन,
प्रत्येक अंगाचा हा विचार कण
दुधदुभत्यांनी वाढते पाैष्टीकता,
याने खुलते शरीराची कांता
गाेमूत्र हे अमृत आमच्यासाठी,
शेणखत जमिनीचा पोत वाढवण्यासाठी
काय सांगू प्रत्येक अंगाची महती,
वेद,उपनिषदे, पुराण या कथा सांगती
वसुबारस म्हणजे आमच्या कृतज्ञतेचे भान,
कृषीप्रधान संस्कृतीचा आम्ही ठेवताे मान
आता ठेवा गाेधनाची जाणीव आणि संवर्धन,
हेच आमच्या शेतीविश्वाच्या संस्कृतीचे जतन
