आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस
1 min
80
आठवणींचा पाऊस,आठवणींचे ढग दाटतात,
आठवणींच्या गारा,आठवणी मनात साठतात
आठवणींचा पाऊस,स्मृती तुडुंब भरलेल्या,
मंत्रमुग्ध करतात आठवणी,आहेत त्या भारलेल्या
आठवणींचा पाऊस,भरताे आठवणींचा कुंभ,
आठवणींचा जळताे पीळ,उरताे आठवणींचा सुंभ
आठवणींचा पाऊस,भरावे आठवणींचे नद्या नाले,
आठवणी काढली तरी उरतात आठवणींचे प्याले
