स्मरण बापाचे
स्मरण बापाचे
आज आहे फादर्स डे, म्हणून नाही आठवण
तर तुमच्या प्रेमाची, माझ्या मनात साठवण
आठवण तुमची येते पदाेपदी, म्हणून शाबूत ठेवली मी
तुमच्या संस्काराची आणि वारशाची गादी
माझे तुम्ही पप्पा, बापू तुम्ही शिक्षकांचे
तुमच्यासारखे भाषण, मला नाही जमायचे
कुठल्याही विषयाची, तुम्हाला हाेती जाण
बाेलायला लागले तर, वेळेचं नव्हतं भान
विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक, म्हणून तुम्ही मिरवली शान
साधेपणात तुम्ही जगले, म्हणून पप्पा आमचे महान
कुठलाही नव्हता बडेजाव, मनी नव्हता अहंकार,
आयुष्यात खूपच केले, नियतीने प्रहार
खडतर आयुष्य जगून, तुम्ही संपदा कमवली,
लाखाे विद्यार्थी घडवून, तुमची ओंजळ रिती राहिली
रयतेचे तुम्ही सच्चे पाईक, पचवले अपयशाला,
अभिमानाने जगले, वाकवले तुम्ही मरणाला
कमाई तुमच्या माणूसकिची, हीच आमची शिदाेरी
सर सदैव स्मरणात राहतील,हीच तुमच्या कार्याची पावती
