STORYMIRROR

Amit Pophale

Classics

3  

Amit Pophale

Classics

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ

1 min
14.3K


माणसा रे माणसा 

एकदा माणसासारखा वागून बघ

दान-धर्माच्या व्याख्या बदलून

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ

शाळेसाठी दोन रूपये देताना हजार चौकशी करशील

पण मंदिराला दोन हजार मात्र खुशाल देशील

शाळेची फर्शी साधी ठेवशील

पण मंदिराला संगमवरी लावशील

शाळेचे छप्पर गळके राहिल

पण मंदिराला मात्र सोन्याचे कळस चढवशील

मग एकदा शाळेचा जीर्णोधार करून बघ

दान-धर्माच्या व्याख्या बदलून

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ

मॉलमध्ये असेल त्या किंमतीत वस्तु खरेदी करशील

पण फुटपाथवर बसलेल्या गरिबाकडे मात्र भाव करशील

अन्नदात्याची परिस्तिथी जाणुन घेऊ शकत नाही

सादे शेतकऱ्याला बियाणे दान करू शकत नाही

जेवताना अन्न गरजेपेक्षा जास्त वाढून घेशील

संपले नाहीच तर उकिरड्यावर टाकशील

मग एकदा उपाशाला घास भरवून बघ

दान-धर्माच्या व्याख्या बदलून

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ

दगडाचा देव करून तू माणसातला देव विसरतोस

अंधश्रधेच्या विळख्यात पडून मुक्या जिवांना मारतोस

सोने-चांदी देवाला अर्पण करतोस

आणि तेच दागिने दुसऱ्या बाजूने लिलावात काढतोस

घरात न चुकता देव पूजा करतोस

पण स्वताच्या जन्मदात्यांना मात्र वृद्धाश्रमात टाकतोस

अरे वेड्या मानवा,कधीतरी स्वता: मधला देव जागा करून बघ

दान-धर्माच्या व्याख्या बदलून

जगण्याचे सूत्र चुकतय का बघ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics