अंतयात्रा
अंतयात्रा
अंत्ययात्रेस माझ्या
सारे जण आवर्जून यावेत
फुल-हार नि कपड्यांची गादी नको
फक्त कुटुंबाला आधार द्यावेत
शेवटचा श्वास घेताना
माझी जन्मदाती जवळ हवी
रडण्यापेक्षा अर्धांगिनीने
पुढे लढण्याची हिंमत करावी
मेल्यानंतर माझ्या नावाची
पंचपकवाने भरू नका वाडी
कावळा समजून मला
कोणी ओरडा करू नका घडी
मी सरणावर जाण्याआधी
माझ्या अवयवांना करून टाका दान
जगण्यास धडपणाऱ्या त्या जीवांना
मिळावा थोडा जगण्याचा मान
नकळत माझ्या जाण्याने
कुटुंबाची मायेने भरून काढा उणी
पण अंगात आलाय माझ्या
असा खोटेपणा करू नका कोणी
अमावास्येलाच येईन मी
म्हणून कोणी देऊ नका झाडाखाली नारळ
येणंच शक्य झालं तर
कधीही हक्काच्या घरात येईन मी सरळ
आत्मा शांत करायला
कोणी करू नका अनिष्ट विधी
अहो,सरणावरच राख झाली की
मी येऊ शकेन का कधी
मुठी आवळून आलेल्या देहाची
उघड्या मुठीने होते राख
पण, आपल्याच अनैतिक गोष्टी
करून टाकते त्याच्या अस्तिवाचीही खाक
