STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Classics Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Classics Inspirational

रंग किती हा वेगळा

रंग किती हा वेगळा

2 mins
120

निसर्गाचा रंगच वेगळा.......

निसर्गाच्या या अंथरुणावर अनेक रंगाचे मिश्रण आपणास बघायला मिळते......

हिरवी हिरवी झाडं ......

मधेच डोकावणारे रंगी बेरंगी फुलं.......

कुठे लाल तर........

कुठे पिवळे.......

निळे, काळे, गुलाबी.......

किती किती रंगांची ही फुलं.....

आपल्याला वाकुल्या दाखवत , आपल्याकडे बघून हसत असतात...

ती आपणास मोहून घेतात......

त्यांचे ते रंग बघून आपण ही रंग होऊन दंग होऊन जातो........

मधेच एक रंगीत फुलपाखरू हळूच अवतरते...

आणि फुलाचा गालगुच्च घेऊन दूर भीरभिरत निघून जाते.......

आपण त्याच्या त्या रंगात आपलाही रंग विसरून जातो.....

मग सहजच वर आकाशात नजर जाते.......

वर निळे निळे आकाश तिथूनच आपणास आपल्या निळ्या रंगात निळे निळे करून टाकते........

मधेच एक काळा पांढरा ढग आपल्या कडे टक लावून बघत असल्याचा भास होतो........

वाऱ्यालाही मग वेग चढतो.......

आणि डोक्यावरचे काळे काळे केस झुलायला लागतात.........

वृक्ष वेली हलायला लागतात.......

किती सुंदर मनोहारी असते ते दृश्य....

मन निसर्गाच्या त्या अलौकिक रचनेत स्वतःचेच अस्तित्व विसरून जाते......

किती तरी वेळ असाच जातो पण ती रंगांची मोहिनी काही दूर होत नाही.........

सहजच मग आठवते ती रंगांची रंगीत होळी......

ते बालपण ......

त्या रंगीबेरंगी पिचकाऱ्या......

त्यात विविध रंगांचे पाणी भरून दुसर्यांनाही रंगात हरवायचे.........

तोंडाला रंग फासून त्याला कोण तो तेच विसरायला लावायचे..........

रंगात न्हाऊन निघायचे.......

खरच अनोखीच ती रंग पंचमी..........

किती उत्साह....... किती आनंद.........

वाटतं परत ते दिवस यावेत.........

आणि पुन्हा रंग होऊन नाचावे बागडावे..........

खूप मस्ती करावी. पण.....

आता आपण मोठे झालोय......

ही जाणीव होताच, मन खट्टू होते........

वाटत का मी असा मोठा झालो.......

तसाच लहान.... निरागस......

राहिलो असतो तर.......

नकोच वाटतं हे मोठेपण........

 खरच आहे.......

लहानपण दे गा देवा...

मुंगी साखरेचा रवा.......

वर पक्षांचा थवा .....

मला तोच मी हवा....

बघ ना तू देवा....

लावील तुजपुढे मी दिवा....

मला रे तोच मी हवा .....

पण एकदा मोठे झाल्यावर कुठे लहान होता येते.......

बस........

त्या आठवणींना आळवायचे ...........

आणि परत लहान झाल्याचे स्वप्न बघायचे...........

त्यातच मग आनंदी व्हायचे........

खूप खूप रंग उधळायचे.........

रंगात न्हाऊन निघायचे........

रंगच होऊन जगायचे...........

रंग लाल गुलाबी....

झोके तुझा नवाबी...

रंग हिरवा घाले वारा..

आकाशात चमकमतो तारा...

फिटते पारणे डोळ्याचे...

रंग करतो इशारा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract