Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

लाडू

लाडू

2 mins
226


स्मरणशक्तीचा लुकाछुपी खेळ

कधी कळलाच नाही

काही किस्से सपशेल

विसरून जातो आपण

कुणी कितीही आठवण करून दिली

तरी आठवायचं नाव घेत नाही

तर काही किस्से स्मृतीपटलावर

अगदी स्पष्ट चित्र उमटवतात...


असाच एक बालपणीचा

स्मरणात राहिलेला किस्सा

शाळेत असताना मधल्या सुट्टीत

एका वर्ग मैत्रिणीशी बोलत होते

तेव्हा तिने सांगितले की

तिची मोठी बहीण आलेली आहे माहेरी

काहीच दिवसांपूर्वी

तिची डिलिव्हरी झालेली आहे

घरात तान्हं बाळ असल्याने

वेळ कसा जातो कळतच नाही

आणि अजून काय काय सांगत होती

पण माझ्या डोक्यात मात्र

भलतंच काही चाललेलं

घरी बाळंतीण आहे म्हणजे

नक्की तिच्या आईने

डिंकाचे लाडू केलेले असणार

आणि माझ्या तोंडून नकळत हे निघालेच

तिला कळलं की

मी हे विचारते आहे म्हणजे

मला ते लाडू खूप आवडत असणार

ती लगेच म्हणाली की

ये मग घरी खायला

दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितले की

आज शाळा सुटल्यावर मैत्रिणीकडे जाणार आहे

तर थोडा उशीर होईल घरी परत यायला

मग ती मला तिच्या घरी घेऊन गेली

मला मस्तपैकी लाडू खाऊ घातला

मस्करित म्हणाली

मेथीचा लाडू पण देऊ का?

खूप साऱ्या गप्पा झाल्या

त्या गप्पांमधला एक विषय

आणि हा डिंकाच्या लाडवाचा किस्सा

कायम लक्षात राहिला...


असाच एक लाडवाचाच किस्सा म्हणजे

कॉलेज मधे असताना

मित्राच्या मोठ्या भावाचं लग्न होतं

त्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणी

त्याच्या गावाला गेलो होतो

दुसऱ्या दिवशी परत निघताना

सर्वांचा निरोप घेत होतो

तर त्यांनी लग्नाची मिठाई म्हणून

मोतीचूर लाडू चा डब्बा दिला

जेव्हा जेव्हा आठवतं तेव्हा

त्या लाडवाची चव अजूनही

जिभेवर तशीच्या तशी तरळते

तसच लहानपणी लग्नांमधे

आचाऱ्याने काढलेल्या गरम गरम बुंदाचे

गोळका करून वळवलेले ताजे लाडू

किंव्हा भंडाऱ्यात पत्रावळीवर वाढलेला

देवाच्या प्रसादाचा बुंदीचा लाडू

त्या लाडवांची चव नि

ते गोड *हरवलेले बालपण*

खूप मिस करते आता...


असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू

आणि त्याची इक्स्क्लूसिव चव

अजूनही शोधत असते मी

पण सर्वात आवडता तोच तो!

आईच्या हातचा डिंकाचा लाडू!!

दर हिवाळ्यात त्याची मी वाट पहाते

आता लॉकडाऊन पासून स्वतः बनवते

खिलवते आणि मी ही खाते

रोज एक लाडू खायची

अशी तलब लागते ना

आणि खाल्ल्यावर माझं बालमन

असं तृप्त होतं म्हणून सांगू!.......



Rate this content
Log in